काटी :- तुळजापूर काटी येथे सोमवार दि. 6 ऑगस्ट रोजी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांची प्रत्येक घरामध्ये गॅस या संकल्पनेनूसार अंत्योदय योजनेनुसार व दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी असणाऱ्या भारत सरकारच्या धूरमुक्त अभियान अंतर्गत येथील पेट्रोलियम मंत्रालयामार्फत ग्राम स्वराज्य अभियान व उज्वला प्लस योजने अंतर्गत मोफत गॅस कनेक्शनचे वाटप शिवसेना उपनेते तथा रायगडचे माजी आमदार अनंत तरे, सभापती शिवाजीराव गायकवाड, महाराष्ट्र कोळी समाजाचे सचिव मदन भोई, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अविनाश कोळी, सरपंच आदेश कोळी आदी मान्यवरांच्या हस्ते तामलवाडी येथील ग्रामीण वितरक विकास कांबळे यांच्या जिजाई माऊली गॅस एजन्सी यांच्या वतीने आयोजित एकूण 15 लाभार्थ्यांना मोफत गॅस कनेक्शन दिले असून प्राधिनिधीक स्वरुपात पाच लाभार्थ्यांना उज्वला गॅसचे वितरण करण्यात आले.
यावेळी उज्वला गॅसचे वितरक राम कांबळे यांनी प्रत्येक ग्रामीण भागातील घरामध्ये उज्वला योजने अंतर्गत गॅस पोंहचविण्याचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून या योजने अंतर्गत यापुर्वी जिजाई माऊली गॅस एजन्सीज माध्यमातून उज्वलाचे 250 गॅस कनेक्शन दिल्याची माहिती दिली व एलपीजीच्या सुरक्षित वापराबाबत घरोघरी जाऊन प्रात्येकक्षिकासह उज्वला विस्तारित योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
या कार्यक्रमावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार अनंत तरे, पंचायत समिती सभापती शिवाजीराव गायकवाड, महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिव मदन भोई, भाजपचे अविनाश कोळी, सरपंच आदेश कोळी, उद्योजक शिवाजी पवार, जयश तरे, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सुजित हंगरकर, प्रदीप साळुंके, अतुल सराफ, जयाजी देशमुख, गणेश कोळी, सिध्देश्वर कोळी, ग्रा.प. सदस्य सुहास साळुंके, जितेंद्र गुंड, बाळासाहेब भाले, बापु वाडकर, वितरक , राम कांबळे, प्रविण विभुते, आदीसह महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.