काटी :- तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील भारतीय जनता पक्षाचे  प्रदेश  कार्यकारणी सदस्य  अविनाश  कोळी यांच्या  मातोश्री कै. नागरबाई जालिंदर  कोळी  यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना  उपनेते  तथा माजी आमदार  व कोळी समाज  संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत  तरे यांनी  सोमवारी कोळी परिवारातील  सदस्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कोळी परिवाराच्या वतीने  आयोजित  कार्यक्रमात ग्रामस्थांच्यावतीने अविनाश  कोळी यांच्या हस्ते त्यांचा  सत्कार करून  स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना संबोधित  करताना माजी आमदार  अनंत  तरे म्हणाले की,  आईवडील  हेच आपले  गुरु असून  आईवडीलांची  सेवा  केल्यास जीवनात  अपयश  कधीच  येणार  नसल्याचे  सांगून कोळी बंधूंनी सलग  बारा वर्षे आईच्या  पुण्यतिथी  निमित्त  विविध  कार्यक्रम आयोजित  करत असल्याबद्दल त्यांनी कोळी बंधूंचे कौतुक केले. 
यावेळी  प्रस्ताविक करताना अविनाश  कोळी म्हणाले की, सामाजिक  सलोखा  राखणे ही प्रत्येकांचे कर्तव्य  आहे.   परंतु  काटी सारख्या गावात  सर्व धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहत असून  विविध  उपक्रम  खेळीमेळीच्या वातावरणात  पार पडतात असे  आवर्जून सांगितले.                     
     यावेळी अनंत  तरे,  पंचायत समिती सभापती  शिवाजीराव  गायकवाड, यशदाचे प्रशिक्षक  शिवाजी  पवार,   भाजपचे  अविनाश  कोळी,  सरपंच  आदेश  कोळी, सयाजीराव देशमुख, सुजित हंगरगेकर, प्रदीप  साळुंके,  सिध्देश्वर  कोळी, जयाजी देशमुख,  अतुल सराफ, जयश तरे, सुहास  साळुंके, बाळासाहेब  भाले, जितेंद्र  गुंड,   दत्ता सोनवणे,  गणेश कोळी,  आदी मान्यवर उपस्थित होते. 
              या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयाजी देशमुख  यांनी  तर आभार सरपंच  आदेश  कोळी यांनी  मानले.
 
Top