तुळजापूर :-  सकल मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत व कोळी समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी गुरुवार दि. 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी काँग्रेसच्या वतीने तुळजापूर तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 

या आंदोलनास तुळजापूरचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब, जिल्हा सरचिटणीस अशोक मगर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अॅड. धिरज पाटील, युवा नेते सुनिल चव्हाण,  पंचायत समितीचे माजी सभापती संतोष बोबडे, पं.स. सभापती शिवाजी गायकवाड, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा डाॅ. राजलक्ष्मी गायकवाड, नळदुर्गचे नगरसेवक नय्यर जहागिरदार, माजी जि.प. सदस्य पंडित जोकार, मुकुंद डोंगरे, राजाभाऊ शेंडगे, सिद्रामप्पा मुळे यांच्यासह नगरपरिषदेचे सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

या आंदोलनाची सुरुवात युवक काँग्रेसच्या कार्यालयापासून भवानी रोड मार्गे हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करुन तहसिल कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलनकरण्यात येणार आहे. 

या आंदोलनामध्ये  बहुसंख्येने सहभागी  होण्याचे आवाहन  काँग्रेसचे  तालुका  अध्यक्ष  अमर मगर यांनी केले आहे.
 
Top