कळंब  (भिकाजी जाधव) :

राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक दि 5 आँगस्ट रोजी कोल्हापूर येथे घेण्यात आली या बैठकीत राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने वतीने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या नुसार आज दि 7 आँगस्ट पासुन राज्यातील 4 लाख प्राथमिक शिक्षक संपात सहभागी झाले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे 

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या व राज्य कर्मचा-याच्या प्रश्नासाठी राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना समन्वय समितीने दि 7,8 व 9 आँगस्ट रोजी संप पुकारला आहे त्यानुसार राज्यातील 4 लाख शिक्षक संपात सहभागी झाले आहेत,त्या मुळे राज्यातील 75 हजार शाळेला अघोषित सुट्टी मिळाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
 
Top