तुळजापूर :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास दि. 2 ऑक्टोबरपासून प्रांरभ होत आहे.
मंगळवार दि. 2 ऑक्टोबर रोजी श्री देविजींची मंचकी निद्रेस सुरुवात होणार आहे. बुधवार दि. 10 ऑक्टोबर रोजी पहाटे श्रीदेवींजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी 12 वाजता घटस्थापना, धार्मिक विधी व रात्री छबीना. गुरुवार दि. 11 ऑक्टोबर रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा व रात्री छबीना. शुक्रवार दि. 12 रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा व रात्री छबीना. शनिवार दि. 13 रोजी ललीता पंचमी श्रीदेविजींची नित्योपचार पूजा, रथ अलंकार महापूजा व रात्री छबीना. रविवार, दि. 14 रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा, मुरली अलंकार महापूजा व रात्री छबीना. सोमवार, दि. 15 रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा, शेषशाही अलंकार महापुजा व रात्री छबीना. मंगळवार, दि. 16 रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा, भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्री छबीना. बुधवार, दि. 17 रोजी दुर्गाष्टमी श्रीदेवीजींची नित्योपचार महापुजा व महिषासुर मर्दिनी अलंकार महापुजा, सकाळी 8 वाजता वैदिक होमास व हवनास आरंभ, दुपारी 12.45 वाजता पूर्णाहुती व रात्री छबीना. गुरुवार, दि. 18 रोजी महानवमी श्री देविजींची नित्योपचार पुजा, दुपारी 12 वाजता होमावर धार्मीक विधी, घटोत्थापन, सायंकाळी सार्वत्रिक सीमोल्लंघन, विजयादशमी (दसरा) शमीपुजन व रात्रौ नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक.
शुक्रवार, दि. 19 रोजी उष:काली श्रीदेवीजींचे शिबिकारोहण, सीमोल्लंघन मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा. मंगळवार दि. 23 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पोर्णिमा रात्री श्रीभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना. बुधवार दि. 24 रोजी मंदिर पोर्णीमा श्री देविजींची नित्योपचार पुजा व रात्री सोलापूरच्या काठयासह छबीना काढण्यात येणार आहे.
- संजय खुरुद, तुळजापूर