ताज्या घडामोडी

बार्शी (गणेश गोडसे) :-
मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद वेळी बार्शी शहर व परिसरातील सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आले होते. यावेळी श्री शिवाजी महाविद्यालयात अनोखा उपक्रम राबवत सर्व कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाची स्वच्छता केली. 
राज्यव्यापी बंदमुळे महाविद्यालय विद्यार्थी उपस्थित नव्हते.  राज्यव्यापी महाराष्ट्र बंद असला तरी महाविद्यालय प्रसाकीय कामकाज सुरू होते. महाविद्यालयात सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  याचवेळी प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालय परिसरात दिवसभर स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी महाविद्यालय व वनस्पतीशास्त्र उद्यान आदी भागात स्वच्छता करण्यात आली.  कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी शैक्षणिक संस्था व हॉस्पिटल उभाकरत मोठे कार्य सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात उभारले आहे. त्याच शिक्षण महर्षी डॉ.मामासाहेब जगदाळे यांचा आदर्श घेऊन श्री शिवाजी महाविद्यालय येथील त्याचे अनुयायी काम करत असल्याचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले. 

 
Top