बार्शी (गणेश गोडसे) :-
मळेगाव ता.बार्शी येथील शिवारातुन मोटरची केबल वायर चोरून नेऊन आर्थिक नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे.
गौस बशीर शेख वय 49 रा.मळेगाव यांनी याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि बार्शी- तुळजापुर रस्त्यावर मळेगाव- जामगाव दरम्यान गट नंबर 221 मध्ये त्यांची शेती आहे.शेतातील मोटारसाठी त्यांनी केबल वायर जोडलेली होती.मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या शेतातील मोटारची केबल वायर चोरून नेली.सकाळी शेतात गेल्यानंतर केबल चोरीचा प्रकार उजेडात आला.
गौस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध पांगरी पोलिसात केबल चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.