बार्शी (गणेश गोडसे) :-
उपळे दुमाला ता.बार्शी येथील 2018-19 मधील रुग्ण कल्याण समिति सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाज़ाबाबत सर्व समिति सदस्यांनी समाधान व्यक्त केले.प्राथमिक आरोग्य केंद्र उपले हे वेगवेगळ्या योजना राबवण्यात जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. त्यामुळे यावेळी उपस्थितांनी वैद्यकिय अधिकारी डाॅ.रमेश खेंदाड यांचे अभिनंदन केले.
या वेळी गटविकास अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, पं.स.सदस्य प्रमोद वाघमोड़े, डॉ .कुलंगे, अमोल नाईकवाडी, राहुल सुरवसे, धनंजय ताटे, पांडुरंग नाईकवाडी, अरविंद भोसले, सरपंच सुदामती कसबे, सर्व कर्मचारी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मधुकर साळुंके यांनी तर सूत्र संचालन लक्ष्मण सावंत यांनी केले.