बार्शी (गणेश गोडसे) :-
विठ्ठल भक्त संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी बार्शी शहरासह तालुक्यातील विविध गावात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.बार्शी शहरातही समाजबांधवानी पुण्यतिथी साजरी केली.
बार्शी तालुक्यातील पांगरी येथील माळी समाज बांधवांनी संत सावता माळी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यानिमित्ताने भजन,किर्तन व अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी सोलापुर जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. वैभव राऊत,माजी सभापती कौशल्या माळी,श्रीरंग क्षिरसागर, दशरथ माळी,बापु राऊत,बंडु माने,लक्ष्मण खबाले,रामचंद्र राऊत,मारूती माळी यांच्या सह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
मळेगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर मळेगाव येथेही संत सावता माळी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. दुपारी 12 वाजता सावता महाराज माळी यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यांत आली. महादेव माळी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.तसेच माळी परिवारातर्फे प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बाल कल्याण समिती माजी सभापती गंगूताई माळी,रमेश दुबे, प्रकाश गडसिंग,मच्छिंद्र सुरवसे, रमेश आवरगंड,धोंडीराम सुतार,मुकुंद नलावडे, सावता परिषद युवक अध्यक्ष अशोक माळी, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी, गणेश भराडे, शिवाजी अंधारे,जनार्धन गडसिंग यांच्या सह महिला, पुरुष व भजनी मंडळी उपस्थित होते.