बार्शी (गणेश गोडसे) :-
बार्शी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक व्यक्तिमत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह बार्शी येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमास आप्पासाहेब खोत, राजा माने, गटविकास अधिकारी प्रमोद काळे,गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, पर्यवेक्षक संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी संतोष जोगदंड पं.स.जि.प. सदस्य उपस्थित होते.
तालुका स्तरावर स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत युवराज गोवर्धन जगताप (दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी) यांनी यश मिळवल्याबद्दल प्रशस्ती पत्रक व सन्मान चिन्ह प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक आप्पासाहेब खोत यांचे हस्ते देऊन सन्मान करण्यात आला. .

 
Top