तुळजापूर :- शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेणा-या चिमुकल्यांचा जीव टांगणीला लागल्याचे दृश्य जिल्हयाच्या शेवटच्या टोक्यावर असलेल्या देवसिंगा नळ येथील जिल्हा परिषद शाळेत नेहमीच पालकांना, ग्रामस्थांना पहावे लागत आहे. अलीकडच्या दोन दशकात दुर्मिळ गाव, वाडी, वस्तीत शिक्षणाची गंगोत्री शासनाने पोहचवली. मात्र सध्या अनेक ठिकाणी शिक्षणाचे तीन तेरा झाल्याचे दिसून येत आहे. 
तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा नळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी पर्यंत शालेय विदयार्थी शिक्षण घेत असून शाळेच्या समोरच्या बाजूस स्लॅबच्या छताचे कॉलम चक्क तुटून पडल्याने शालेय विदयार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहे. या संदर्भात जि.प. शिक्षण विभागास स्वतंत्र जि.प. शाळा इमारतीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले. परंतु शासनाकडून या संदर्भात कारवाई न झाल्याने पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. शालेय व्यवस्थापन समितीकडून वारंवार पाठपुरावा करुनही या प्रकरणाकडे शिक्षण विभागाकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाने केली आहे.

 
Top