तुळजापूर : आगामी होणा-या जिल्हयातील विधानसभा, लोकसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा तुळजापूर तालुक्याचे विदयमान आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील चिवरी पंचायत समिती गणातील काँग्रेस कार्यकर्ता व बुथ कमिटीच्यावतीने देवसिंगा तुळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. चव्हाण हे बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, पंचायत समितीचे सभापती शिवाजी गायकवाड, तुळजापूरचे नगरसेवक सचिन पाटील, मुकुंद डोंगरे, सुधाकर सगट, तानाजी जाधव, दत्ता मस्के, साहेबराव जाधव, सुरेश वाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. मधुकरराव चव्हाण पुढे म्हणाले की, सध्याचे सरकार फसव्या घोषणा देवून नागरिकांची दिशाभूल करीत आहे. राज्यात सर्वत्र हिंसात्मक वातावरण निर्माण झाल्याने सगळीकडे अशांतता पसरली आहे. कुठल्याच घटक भाजप सरकारच्या कामावर समाधानी नसल्याचे आ. चव्हाण यावेळी म्हणाले.
 
Top