लोहारा (इकबाल मुल्ला ) :
सोनारी गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देवु, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी केले.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असणाऱ्या श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी श्रीक्षेञ सोनारी येथे पर्यटन विकास निधीतून 1कोटी 5 लक्ष रु रथमार्ग व अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन दि.10 ऑगस्ट रोजी करुन आमदार सुजितसिंह ठाकुर बोलत होते.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी ,प्रदेश कार्यकारीणी सदस्य नितीन काळे, धनंजय रणदिवे,महिला व बालकल्याण सभापती पती रमेश पवार,तालुकाध्यक्ष सुखदेव टोंपे ,राहुल काकडे ,महावीर काशिद,राजकुमार पाटील,गणेश खरसडे,झहीर चौधरी,श्रीकृष्ण शिंदे,गिरीधर कोलते,बिभीषण हांगे, अंगद फरतडे,निवृत्त मेजर भाऊ मांडवे,बाळासाहेब मोरे,नितीन गाढवे,धोंडीराम फले,नवनाथ खाडे,राजेंद्र गुळमिरे,अण्णा दुबळे,विलास खोसरे,शिवानंद तळेकर,महेश कारकर,रवि खुळे,नागेश गर्जे,राहुल फले,सुधीर हांगे,सुशील कुंभार,जयंत पाटील, निशिकांत क्षीरसागर,सचिन सोनारीकर ,,कांतीलाल पाटील,अतुल ठाकुर,अजित काकडे,रामकृष्ण घोडके,अरविंद रगडे,नारायण लिमकर ,रामदास गुडे ,मकसुद पल्ला,एस.के.पठाण,संदीप शेळके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के.बी. गायकवाड,उपविभागीय अभियंता एस.सी.मुंढे,शाखा अभियंता बी.मैंदाड यांच्यासह ग्रामस्थ व नागरीक उपस्थित होते.