तुळजापूर :- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना 2018-19 अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील 20 गावासाठी कायमस्वरुपी नळपाणी पुरवठा योजनेसाठी रु.11 कोटी 20 लक्ष मंजूर केल्याची माहिती आ.मधुकरराव चव्हाण यांनी दिली. यावेळी त्यांचे समवेत पं.स.सभापती शिवाजी गायकवाड, माजी जि.प.अध्यक्ष धिरज पाटील,गटविकास अधिकारी श्री.ढवळशंख, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता देवकर,उपविभागीय अभियंता श्री.सरवदे सर्व शाखा अभियंता यांचेसह 20 गावचे सरपंच,ग्रामसेवक, विस्तार अधिकारी उपस्थित होते.
पंचायत समिती सभागृहातील या बैठकीत बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, सदरील योजना राबवताना त्याच्या पाण्याचा स्त्रोत बळकट असावा. त्यानंतरच उर्वरित कामे करावीत तसेच गाव आराखडा करताना विस्तारित भागातील रहिवाशी जनतेसाठी सुध्दा तरतूद करावी, दलित व मागास वस्तीमध्ये अधिकचे नळ कोंडाळे करण्यात यावे, गावामधील सर्व भागामध्ये समान दाबाने पाणी जाईल याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर आवश्यक एच.पी.चे डिमांड भरुन पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळेल याची दक्षता घ्यावी, प्रसंगी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर टाकवा त्याच बरोबर फिल्टर ची व्यवस्था करावी.
यामध्ये बाभळगाव (49.33),ढेकरी (34.39),हगलूर (44.08),काळेगाव (49.60), कार्ला (78.59), कसई (20.00),काटगाव (25.70),काटी (82.37),खुदावाडी (26.03), किलज (84.81), मोर्डा (12.26), राखेल (43.77),सांगवी मार्डी (41.79), खोताचीवाडी (43.01),सावरगाव (147.47), सुरतगाव (56.39),वडगाव काटी (152.07),खुंटेवाडी (49.77), वाणेवाडी (56.41), दहिवडी (29.30) इ.गावांचा समावेश आहे.कंसातील रक्कम लक्ष मध्ये आहे.

 
Top