नळदुर्ग :- दि. 29 जुलै रोजी बेकायदेशीर वाळू वाहतुकीबाबत तुळजापूर लाईव्ह वर वृत्त प्रसिध्द होताच महसूल विभागाने इटकळ ता. तुळजापूर शिवारात राष्ट्रीय महामार्गावर अवैध वाहतुक करणा-या वाळूचे दोन ट्रक पकडून कारवाई केली. या दोन्ही वाहनात साडे दहा ब्रास वाळू आढळून आल्याने तुळजापूर तहसिलदाराने 6 लाख 66 हजार 495 रुपयेचा दंड केला आहे.
"अवैध वाळू वाहतुकीने नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याची झाली चाळण; शहरात रस्त्यालगत वाळू उतरवून पसार होण्याचे प्रमाण वाढले" या मथळयाखाली दि. 29 जुलै रोजी तुळजापूर लाईव्ह वर वृत्त प्रसिध्द झाले होते. या वृत्ताची दखल घेवून तुळजापूर तहसिलदार दिनेश झापले, नायब तहसिलदार अमित भारती यानी सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील इटकळ ता. तुळजापूर येथे अचानक पाळत ठेवून दि. 30 जुलै रोजी पहाटे दोन वाजता हायवा ट्रक क्रं. एमएच 13 एएफ 4246, एमएच 10 झेड 3926 या दोन वाहनाना ताब्यात घेतले. त्यापैकी एका हायवा ट्रकमध्ये साडे चार ब्रास वाळू तर दुस-या ट्रकमध्ये सहा ब्रास वाळू आढळून आली. त्याचबरोबर अनुक्रमे 3 लाख 14 हजार 345, 3 लाख 52 हजार 140 रुपये असे मिळून दोन्ही वाहनास 6 लाख 66 हजार 495 रुपये एवढा दंड महसुल विभागाने आकारल्याचे सांगून वाहनमालक व त्यांचे नाव, पत्ते यांची चौकशी सुरु असून ते मिळताच संबंधित दंडाची नोटीस बजावण्यात येणार असल्याचे तहसिल कार्यालयातील लिपीक निशा पतंगे यांनी सांगितले.
Related Posts
- दिवंगत भिमसैनिक सगट यांना नळदुर्ग येथे रिपाइंच्या वतीने श्रध्दांजली19 Aug 2020undefined
वागदरी : एस.के. गायकवाडपुणे येथील भिमाकोरेगाव प्रकरणातील मुख्य फिर्यादी व साक्षीदार असलेले दिवंगत भिमसैनिक सुरेश सगट याना नळदुर्ग ता.तुळजापूर ये...Read more »
- चिवरी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार15 Aug 2020undefined
चिवरी, दि. 15 : देश रक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्यदलातील सेवानिवृत्त झालेल्या चिवरी येथील आजी-माजी सैनिकाचे व मयत झालेल्या सै...Read more »
- चिवरी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजूंना किराणा किटचे वाटप15 Aug 2020undefined
चिवरी, दि. 15 : कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगात थैमान घातल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांची उपासमार होत आहे याचे गांभीर्याने विचार करून ...Read more »
- अणदुर गाव होतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; रविवारी 18 रुग्णांची भर02 Aug 2020undefined
नळदुर्ग :- अणदूर ता. तुळजापूर या ठिकाणी दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून ते चिंताजनक आहे. रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी नव्याने 18 रुग्णां...Read more »
- होर्टी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत वृक्षारोपण22 Jul 2020undefined
जळकोट,दि. २२ : मेघराज किलजे...Read more »