काटी :- राज्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या गा.न. नं 7/12 संगणकीकरणात "ई-फेरफार" प्रणालीमध्ये अचूक गा.न.नं 7/12 व गा.न.नं. 8 अ साठी आपले काम उत्कृष्ट केल्याबद्दल व त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना शासनाच्या महसूल विभागातर्फे काटी ता. तुळजापूर सज्जाचे सज्जाचे तलाठी दत्ता कोळी यांचा दि. 1 ऑगस्ट या महसूल दिनाचे औचित्य साधून वाशी येथील बालाजी मंगल कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रशस्तिपत्रकावर मनुकुमार श्रीवास्तव सचिव ( महसूल ) महाराष्ट्र शासन, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी राधाकृष्ण गमे, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमन, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे,दिनेश झांपले आदी मान्यवरासह जिल्हाभरातील महसूल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तलाठी दत्ता कोळी यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल काटीसह परिसरातून कौतुक होत आहे.