नळदुर्ग :- येथील साठे नगर येथे दि. 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लहुजी चौकातुन भव्य मोटार सायकल रँली शहरातुन काढण्यात आली. यावेळी शेकडो लहु सैनिकांनी या रॅलीत सहभागी झाले होते.
सदरील रॅलीचे साठे नगर येथे समारोप करुन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या हस्ते करुन प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वारे, पोलीस उपनिरीक्षक अनिल खोडेवाड, हवालदार आर.के. पटेल यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड़, जयंती कमिटीचे अध्यक्ष किरण काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी राम गायकवाड़, धनराज गायकवाड़, श्रीकांत गायकवाड़, नारायण हजारे, नाना गायकवाड़, नवनाथ काळे, बाबुजी काळे, विनोद भिसे, करऩ देडे, महादेव काळे, मोहन काळे, किशोर क्षिरसागर, भैया कांबळे, खंडु बोराडे, राम देडे, रोहन गायकवाड़, रजनिकांत गायकवाड़, वैभव काळे, महेश काळे, सुरज देडे, लहु देडे आदी युवक उपस्थित होते.