![]() |
बोरी धरण |
नळदुर्ग (शिवाजी नाईक) :- यंदाच्या वर्षी पावसाळा सुरु होवून दोन महिने उलटले असून सर्वत्र पावसाने दाणादाण उडवले असले तरी तुळजापूर तालुक्यातील अनेक तलावामध्ये पावसाचे नवीन पाणी आले नाही. श्री क्षेत्र तुळजापूर, अणदूर व नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा करणा-या नळदुर्ग येथील कुरनूर मध्यम (बोरी धरण) प्रकल्पामध्ये दि. 1 ऑगस्ट अखेर 21.74 टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा असून तुळजापूर तालुक्यातील 65 तलावापैकी 53 साठवण तलाव व लघु पाझर तलावात पाणी जोत्याच्या पातळीखाली आहे. तर 9 तलावात नाममात्र पाणीसाठा असून तीन तलाव कोरडेठक आहेत.
यावर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाले असले तरी आजही अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या 29.9 टक्के पावसाची नोंद आहे. अपु-या प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातील तलावांची तहानही कायम आहे.
तुळजापूर तालुक्यातील आरबळी साठवण तलाव, केमवाडी साठवण तलाव, आरळी लघु पाझर तलाव कोरडेठक आहेत. तर सलगरा दिवटी साठवण तलाव, फुलवाडी सा.त., चिवरी क्रं 1 सा.त., चिवरी क्रं 2 सा.त., वडगाव सा.त., वाणेगाव सा.त., केशेगाव सा.त., निलेगाव सा.त., चिकुंद्रा सा.त., होर्टी क्रं. 1 सा.त., होर्टी क्रं. 2 सा.त., मुर्टा क्रं. 1 सा.त., येडोळा सा.त., लोहगाव सा.त., नंदगाव सा.त., शहापूर सा.त., खुदावाडी सा.त., सलगरा मड्डी सा.त., सिंदगाव सा.त., कुन्सावळी सा.त., चिवरी उमरगा लघु पाझर तलाव, हरणी मध्यम प्रकल्प, इटकळ लपा, पळस निलेगाव लपा, दिंडेगाव लपा, सांगवी माळंब्रा लपा, काटी दहीवाडी लपा, गंजेवाडी लपा, भारती लपा, सांगवी काटी लपा, पिंपळा ल.पा., सावरगाव सा.त., केमवाडी सा.त., तामलवाडी सा.त., देवकुरळी सा.त., कदमवाडी सा.त., धोत्री सा.त., मंगरुळ ल.पा., कसई नांदुरी ल.पा., यमाई ल.पा., काळेगाव सा.त., कुंभारी सा.त., हंगरगा तुळ ल.पा., कामठा ल.पा., बंचाई ल.पा., मसला ल.पा., सिंदफळ सा.त., आपसिंगा सा.त., हंगरगा तुळ सा.त., ढेकरी सा.त., खंडाळा सा.त., वडगाव लाख सा.त., तडवळा सा.त., असे एकूण 53 तलावे दि. 1 ऑगस्ट अखेर जोत्याच्या पातळीखाली आहेत.
त्याचबरोबर खंडाळा मध्यम प्रकल्पात 25.21 टक्के, किलज 5.76 टक्के, देवसिंगा तुळ 2.40, होर्टी लपा 2.42, मुर्टा 22.53, अणदूर 6.76, जळकोट 2.80, आलियाबाद 30, हंगरगा नळ लपा 8.27, हंगरगा नळ सात 14 आदी तलावात जेमतेम पाणीसाठा आहे.
यंदाच्या वर्षी तुळजापूर तालुक्यात जूलैअखेर 29.9 टक्के एवढयाची पावसाची नोंद झाली आहे. मंडळनिहाय झालेल्या पावसाची नोंद पुढीप्रमाणे - तुळजापूर 272 मि.मी., मंगरुळ 195 मि.मी., सावरगाव 355 मि.मी., नळदुर्ग 291 मि.मी., जळकोट 273 मि.मी., सलगरा दिवटी 219 मि.मी., इटकळ 151 मि.मी., असे एकूण 1755 मि.मी. पावसाची नोंद आहे.
पूर्व प्रसिध्द पुढारी