कळंब (भिकाजी जाधव) :-
मुलगी म्हंटल की नाक डोळं मोडणाऱ्या समाजापुढे आदर्श निर्माण केलाय कळंब तालूक्यातील मौ. भाटशिरपुरा येथील हारूण बाबूलाल शेख (मुलानी) यांनी आपल्या नातीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त वृक्षाचे वाटप करून मित्र परिवारासोबत वाढदिवस साजरा केला. दि. 18 जुलै रोजी हारूण भाई यांचा धाकटा मुलगा असेफ यांची मुलगी आयेशा हिचा पहिला वाढदिवस होता, वाढदिवसाच्या निमित्त पै पाहूण्यांसह मित्र परिवार मोठ्या संख्येने याकरिता उपस्थित होता. जेवनावळीसह केक आणि उपस्थित प्रत्येकास एक रोपटे देण्यात आले आणि झाडे लावा झाडे जगवा, तसेच या झाडाप्रमाणे मुलगी वाचवा... देश वाचवा हा संदेश देण्यात आला, यावेळी 125 चिकूच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी पर्याय संस्थेचे महिला पुरूष कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने हजर होता.