याबाबत प्राप्त अधिक माहिती अशी कि, बार्शी आगारामधुन पुणे येथे जाण्यासाठी अनेक प्रवाशी बार्शी बस स्थानकावर उभे असताना चालक वाहकांनी एम एच 11 बिएल 9339 ही बस बार्शी बसस्थानकावर आणुन लावली.दरम्यान बार्शी येथील घननिळ दिवटे हे बार्शी येथुन पुणे येथे आपल्या खाजगी कामानिमित्त जाण्यासाठी बस स्थानकावर बसची वाट बघत बसले होते.बार्शी आगाराची बार्शी ते पुणे ही बस लावण्यात आल्यानंतर बसमध्ये बसत असताना दिवटे यांच्या निदर्शनास आले की सदर बसला चालकाच्या पाठीमागील टायरला नट नाहीत व जे नट होते तेही लुज अवस्थेत असल्याचे दिसले.त्यांनी सदर बाब चालक वाहकाच्या निदर्शनास आणुन दिली. दरम्यान बसमध्ये पुणे येथे जाण्यासाठी 30 प्रवाशी बसलेले होते. त्यानंतर सर्व प्रवाशांना बसमधुन उतरवुन बस पुन्हा डेपोमध्ये नेण्यात आली. प्रवाशाने वेळीच लक्ष दिल्यामुळे होणारी दुर्घटना टळून अणेकांचे प्राण वाचले आहेत.भविष्यात अशा निष्काजी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता संबंधित विभागाच्या वतीने घेणे गरजेचे आहे. बसमधील प्रवाशांनी दिवटे यांनी दाखवलेल्या जागरूकतेबद्दल आभार व्यक्त केले.