बार्शी (गणेश गोडसे) :-
आपल्या कुटुंबात आईकडून होणाऱ्या संस्कारावर आपला मुलगा कोण होणार ठरणार असते.मुलगा बाहेर आपल्या घराची इज्जत घेऊन फिरत असतो. शिवाजी महाराज डोक्यात शिरले पाहिजे. मुलांना नाचवू नका तर वाचायला शिकवा.त्याला निर्भीड संस्कार द्या असे आवाहन प्रा.विशाल गरड यांनी केले.ते बार्शी येथील सहयोग स्थानिक रहिवासी मडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ कालच्या आणि आजच्या या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.अध्यक्ष स्थानी हरिश्चंद्र डोईफोडे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ.दीपक जगताप, बार्शी शहर पोलीस स्टेशन चे नूतन पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील हे होते.व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, अविनाश सोलवट उपस्थित होते.
प्रा. गरड पुढे म्हणाले कोणतेही काम उंचीवर गेल्याचा आनंद होत असतो ज्या सहयोग मध्ये बसून व्याख्याने ऐकली तिथे व्याख्यान करायची संधी मिळाली.पालकांनो मुलांच्या कुबड्या बनू नका.विचार मोठा करा.उद्योजक बनण्याचा प्रयत्न करा.जिजाऊ चे संस्कार विसरून चालणार नाही,जिजाऊ नी नेहमीच शिवरायांना बळ देण्याचे काम केले.असे सांगत त्यांनी दोन छत्रपती घडवले. आजच्या आयांनी आवल्या मुलांना मुक्तपणे फिरू द्यावे त्याला सतत बंधनात बांधून ठेऊ नये असेही गरड म्हणाले.
सर्जेराव पाटील म्हणाले,मुलांना घडविण्यात आईचा मोठा वाटा असतो.महिलांनी शिकले पाहिजे, धाडसी असावे.शहर सुरक्षित ठेवण्या साठी प्रयत्न शील असणार आहे. महिलांनी जागरूक राहावे.छोट्या मोठ्या घटना पोलिसांना सांगत चला.मी पूर्णपणे तुमच्यासाठी उपलब्ध आहे असा विश्वास उपस्थित महिलांना दिला
काकडे यांनी आपल्या प्रास्ताविकात मंडळाच्या वाटचालीचा आढावा घेतला. अविनाश सोलवट यांनी मंडळाच्या भविष्यातील वाटचाली विषयी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन प्रताप जगदाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी सतीश गोडगे, प्रकाश गव्हाणे, रामदास तिकटे,राहुल बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.