बार्शी (गणेश गोडसे) :  बार्शी शहर व तालुक्यात लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले.तहसिल कार्यालय, बार्शी नगरपालिका, पोलिस ठाणे, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती  आदी शासकीय निमशासकीय कार्यालयातही आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. 
# बार्शी टेक्निकल हायस्कुल :- बार्शी टेक्निकल हायस्कुल
 मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रशालेचे उपमुख्याध्यापक जी. जी. वाघमारे व पर्यवेक्षक बी. एस.वाघमारे यांच्या हस्ते दोन्ही प्रतिमांचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात
आले. कार्यक्रमांची सुरुवात इ. १० दहावीच्या विद्यार्थिनी कु. काजल गव्हाणे, कु. वैशाली शिंदे यांनी आण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले गीत अतिशय मधुर आवाजात सादर केले.
    लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जीवन त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यत्यांनी लिहिलेली पुस्तके यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. 
    अस्मिता खगळे,ज्ञानेश्वरी क्षिरसागर,श्रृती ताटे,कोमल जाधव, वैष्णवी वायचळ, संध्या जाधव,प्रिती गोसावी यांनी भाषणे केली. प्रथम आलेल्या कु समृद्धी संतोष होनराव तिचा सत्कार करण्यात आला. 

# महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्था,गुळपोळी - 
बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वर्तीने लोकशाहिर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अध्यक्षस्थानी बाळासाहेब चिकणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष गणेश लंगोटे, गुळपोळी गावचे पोलिस पाटील बाळकृष्ण पिसे आदी उपस्थित होते.साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार गणेश लंगोटे बाळासाहेब चिकणे बाळकृष्ण पिसे यांच्या हस्ते घालण्यात आला सर्व मान्यवारांचे सत्कार संस्थेच्या वर्तीने करण्यात आले
यावेळी गणेश लंगोटे बाळासाहेब चिकणे, बाळकृष्ण पिसे, संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, कमलेश चौधरी, नामदेव चौधरी, गुलाब शेख, राजभाऊ गोरे,धनाजी चिकणे,आलताफ शेख, चंद्रकांत बारवकर, गौतम चौधरी, विजय बारवकर, राजेंद्र भोसले, रणजीत चौधरी, अतुल चिकणे,समाधान बारवकर उपस्थित होते. 

# कर्मविर ग्रंथालय, बार्शी :
मराठी साहित्यामध्ये ज्यांचे फार मोठे मोलाचे योगदान आहे असे लोकशाहीर,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ९८वी जयंती कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय,बार्शी येथे साजरी करण्यात आली. प्रारंभी अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन करण्यात आले.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या उत्तुंग कार्यावर व साहित्यावर यथोचित विचार ग्रंथपाल विनोद गायकवाड,विवेक कदम, स्वप्निल बाराते यांनी व्यक्त केले. यावेळी मंगल माळी,शंकर मोहिते, कृष्णा जाधव, अण्णा मिसाळ,ज्ञानेश्वर सव्वासे, संदीप ताकभाते, दिनेश काकडे, हनुमंत तुपे यांचेसह सभासद व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top