![]() |
पंकज शहाणे |
दुसरा भाग
नळदुर्गमध्ये एका मनोरुग्णास मदतीचा हात देताना त्या व्यक्तीने मोठा दगड घेवून शहाणे यांच्या दिशेने भिरकावला. चुकवलेला तो दगड शहाणे यांच्या कारवर आदळला. मात्र आठवण म्हणून शहाणे यांनी त्या दगडाची निशाणी असेच कारवर ठेवली आहे. अशा लोकांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न करत असताना शासकीय पाठपुरावा करणे अत्यंत जिकरीचे असल्याची बाब शहाणे यांच्या लक्षात आली. मात्र हार न मानता त्यांनी आतापर्यंत आठ मनोरुग्णांना पुणेच्या येरवडा येथील शासकीय मनोरुग्णालयात दाखल केले आहे आणि १८ मनोरुग्णांना प्राथमिक आधार दिला आहे. तसेच ६ बेवारस मृत व्यक्तीवर शासकीय यंत्रणेच्या मदतीने अंत्यविधी केला आहे. वारंवार पाठपुरावा करुन पोलिसांच्या मदतीने मनोरुग्णास जिल्हा न्यायालयात हजर करावे लागते. त्यानंतर दहा ते पंधरा दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार करुन व वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात दाखल करण्याची अतिशय किचकट व वेळकाढू प्रक्रिया आहे. या प्रक्रियेसाठी शहाणे यांनी अनेकदा यशस्वी प्रयत्न केले आहेत. अशा मनोरुग्णाचे देखभाल करताना नाकीनाऊ येते याचे उदाहरण सांगताना रुग्णाची दाढी-कटींग करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. त्यावर उपाय म्हणून त्यांनी बाजारदराच्या सरासरी दहापट रक्कम शहाणे यांनी अनेक वेळा खर्च केली आहे. जिल्हाभरातील मनोरुग्णांचा सर्व्हे करत असताना जवळपास ४० मनोरुग्ण आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

पंकज शहाणे यांनी सन २०१४ मध्ये गुरूवर्य शंकरराव शहाणे ट्रष्टची स्थापना, सन २०१८ मध्ये लोकसेवा फाँऊंडेशनची स्थापना केली आहे.
शहाणे यांचे सामाजिक कार्य
१) महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूर येथील आंबाबाई मंदिर, नळदुर्ग येथील खंडोबा मंदिर परिसरात सहकुटूंब स्वच्छता अभियान राबवले. तसेच तुळजापूर,नळदुर्ग बसस्थानक स्वच्छ केले आहे.
२) हजारो गरजू नागरिकांना कपडा बँकेच्या माध्यमातून मदत
३) मनोरूग्ण, भटके, वेडसर व्यक्तीना मदत
४) आपघात गृस्तांना तातडीने मदत
४) बेवारस व्यक्तीच्या मृतदेहावर शासकीय परवानगीने अंत्यविधी
५) हरवलेल्या मुलांना चाईल्ड लाईनच्या सहाय्याने घरी सुखरूप पोहचवणे
- समाप्त