काटी :- तुळजापुर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील शेतकरी बाजीराव ज्ञानोबा धावणे याना तलावासाठी भुसंपादन केलेल्या जमीनीचा मावेजा न मिळाल्याने धावणे हे वडगाव काटी येथील महादेव मंदीरात दि.13 पासुन आमरण उपोषणास बसले आहेत. 

वडगाव येथील शेतकरी बाजीराव धावणे यांची शेतजमीन हटकरवाडी(सावरगाव ) येथील गट क्र 42 अ व 41/2 मधील 2.08 व 0.8 हेक्टर जमीन वडगाव (काटी ) तलावासाठी १६ वर्षापुर्वी भुसंपादन करण्यात आली.परंतु संपादीत जमीनीचा मावेजा मिळत नसल्याने धावणे यानी दि.20 फेब्रुवारी रोजी मावेजासाठी अर्ज करून उपोषणाचा ईशारा दिला त्यानूसार धावणे दि.9 एप्रिल रोजी उपोषणाला बसले परंतु संबधित अधिकारी यानी धावणे याना दि.10 एप्रिल रोजी तीन महीन्यात मावेजा देण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले.तीन महीने उलटले तरी मावेजा मिळत नसल्याने बाजीराव धावणे यानी पुन्हा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असुन वडगाव (काटी) येथील महादेव मंदीरात त्यानी दि.13 पासुन आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.तसे निवेदन धावणे यानी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस स्टेशन, तहसीलदार,पाटबंधारे विभाग,याना दिले असल्याचे सांगितले व शेतजमीनीचा मावेजा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे बाजीराव धावणे यानी बोलताना सांगितले आहे.
 
Top