काटी :- जिल्हा क्रीडा विभाग उस्मानाबाद, व तुळजापूर तालुका क्रीडा संयोजक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेमध्ये तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंधळवाडीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. 

तालुक्यातील चिकुंद्रा येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात नुकत्याच तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी गोंधळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलीच्या संघाने 14 वर्षे वयोगटात कबड्डी स्पर्धे मध्ये विजय संपादन केला. सदर विजयी संघास क्रीडा शिक्षक व्ही. एन. तोटावाड मुख्याध्यापक बी. एल. बाशेवाड, व्ही. एन. माळी ,डि. बी. मगर   यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाचे कर्णधार म्हणून कु.तृप्ती मोटे हिने नेतृत्व केले .या विजय संघातील खेळाडूंना शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे, तालुका क्रिडा संयोजक एम. जी. पटेल, क्रीडा शिक्षक घोडके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन  सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
 
Top