काटी (उमाजी गायकवाड) :-
वसंत ऋतूचे आगमन होताच निसर्गावर हिरव्या रंगाचे साम्राज्य पसरायला सुरुवात होते. परिसर हिरव्या रंगाची शाल पांघरत असतानाच सणाची रेलचेल सुरू होते. श्रावण महिन्यातील सणामुळे मनाच्या प्रसन्नतेबरोबरच आनंद द्विगुणित होतो. त्यातच महादेवाचे भक्तांगण श्रावण सोमवारी अक्षरशः भक्तीरसात न्हाहुन जातात. श्रावण सोमवारी भक्ताची वारी काटी येथील महादेवाच्या नील कंठेश्वर मंदिरात गर्दी होत आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी धोंडीबा स्वामी यांच्या वतीने भाविकांना केळीचे वाटप करण्यात आले. श्रावण सोमवारी महादेवाच्या मंदीरात दर्शनासाठी गेलेल्या भक्तांना असाच प्रसंग तुळजापूर तालुक्यातील काटी येथील निलकंठेश्वर मंदीरात अनुभवयास मिळतो. काटी येथील निलकंठेश्वर मंदीर जवळपास एक हजार वर्षापुर्वीचे असुन ते पुण॔त:भुयारी आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हेमाडपंती कलाकुसरीचे आहे. या मंदिरात प्रवेश करताच क्षणभर काहीच दिसत नाही. मंदिर भुयारी असल्याने अंत्यत वातानुकूलीत वाटते. मंदीरात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूंनी नागनाथ ,गणपती, भैरवनाथ, शेषनारायण, आदी देवदेवतांच्या मुतीॅ अतिशय जुन्या आहेत. तर येथे विठ्ठल रुक्मिणीची नवीन मुतीॅची प्रतिष्ठापणाही करण्यात आली आहे.
काटी गावाची ओळख असणाऱ्या या नीलकंठेश्वर अतीपुरातन मंदीराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतानाच आपणास ज्योतिॅलिंगाचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. मंदिरासमोरच भव्य असा दगडी मंडप असुन त्यास खुपच मोठमोठे दगडी नक्षीदार खांब आहेत. मंडपात मध्यभागी महाकाय आखीव व कोरीव अशी सुंदर नंदीची मुर्ती आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात असणारी महादेवाची पिंड ही अखंड पाषाणात चबुतर्यासह कोरलेली सहा फुट लांब व चार फुट रुंदीची विशाल अशी आकर्षक सोळंकी असणारी महादेवाची पिंड या मंदीराच्या पुरातनत्वाची साक्ष देते. अशा प्रकारची स्वयंभू असणारी व भव्यता असणारी महादेवाची पिंड ही आपणास बारा ज्योतिर्लिंग व इतर कोठेही स्थापित नसल्याचे जाणकारांचे मत आहे. या मंदिराच्या बाजूलाच साधारणत: 60 बाय 40 फुट व 40 व्याप्तीची प्रचंड अशी संपूर्ण दगडी बांधकाम केलेली प्रचंड मोठी विहीर आहे. विहिरीच्या तळापर्यंत 40 फुट लांबीच्या दगडी पायर्या आहेत. यंदा पाऊस कमी झाल्याने विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. विहिरीच्या थोडस बाजुलाच गुप्तलिंगाचे अतिप्राचीन मंदीर आहे. वास्तविक पाहता अशा स्वरूपाची मंदिरे क्वचितच असुन पुर्वीपासुन सदरच्या मंदीराची देखभाल करण्यासाठी मंदीरास कायमस्वरुपी खर्चासाठी निलकंठेश्वर मंदीर देवस्थानच्या नावे 30 एकर जमीन आहे. या मंदिराची देखभाल व नित्य पुजा-अर्चा राम गणपत पुरी (गोसावी) करतात. अशा या ऐतिहासिक मंदिरात श्रावण महिन्यात विशेषत: सोमवारी काटीसह परिसरातून महीला अबालवृध्दासह भाविक मोठय़ा संख्येने येऊन मनोभावे दश॔न घेतात.
नव्याने उभारण्यात आलेल्या सभामंडपामुळे मंदीराच्या सौंदर्यात भर
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अविनाश कोळी यांच्या प्रयत्नाने 26 मार्च 2016 तत्कालीन खासदार तथा विद्यमान केद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या 22 लाखांच्या निधीतुन मंदीरासमोर भव्य असा सभागृह उभारण्यात आले असून महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या सभागृहामुळे या मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. या सभामंडपात विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. तर भाविकांना मंदिराकडे जाणे-येणेसाठी ग्रामपंचायतच्यावतीने सिमेंट रस्ता करण्यात आला आहे.