लोहारा (इकबाल मुल्ला) :
देशातील व राज्यातील आपल्या सरकारने सर्वसामान्यांसाठी विविध धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.तरी येणाऱ्या निवडणुकीत आपलाच विजय आहे.तरी पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे,असे अवाहान भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे यांनी केले.
यावेळी प्रमुख म्हणुन जिल्हा सरचिटणीस सतीश (बप्पा) देशमुख,भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे,भाजप तालुकाध्यक्ष विक्रात संगशेट्टी,उमरगा,लोहारा तालुका विस्तारक शिध्देश्वर माने,अदि उपस्थित होते.
या बैठकीत तालुक्यातील सर्व बुथ प्रमुखांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत लोहारा तालुक्यातील नूतन भाजप मध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दिनकरजी जावळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच तालुक्यातील कानेगाव,रुद्रवाडी,फानेपुर येथील युवक विजय माणिक दांडेकर,बाबुराव नागप्पा मंजुळे,राम सुहास भिसे,शिवाजी मोहन,अप्पा गायकवाड,किरण जाधव,अदिंनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करुन भाजप पक्षात प्रवेश देण्यात आले.
यावेळी हाजी बाबा शेख,भाजप तालुका सरचिटणीस शिवशंककर हतरगे,तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,भाजप शहराध्यक्ष अशोक तिगाडे,भाजप अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष आरीफ शेख,भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण,विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष बाबा सुंबेकर,किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी,पं.स.सदस्य वामन डावरे,पं.स.सदस्य ज्ञानेश्वर परसे,ओ.बी.सी.शहराध्यक्ष सुमित झिंगाडे,प्रशांत लांडगे,सुभाष गिरी,काशिनाथ घोडके,गहिनीनाथ कागे,वीरेंद्र पवार,नामदेव सुर्यवशी, अजित ढोणे,नेताजी शिंदे,सलीम मुजावर,दयानंद फरिदाबादकर,परमेश्वर कदम,आकाश कांबळे,रोहित पूर्ण,महेश पोतदार,बालाजी सोनटक्क,यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी,शक्ती प्रमुख,बुथ प्रमुख व सर्व जि.प.गट व पं.स.गणातील व लोहारा शहरातील तालुकयातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.