नळदुर्ग :- खोटी व दिशाभूल करणारी आश्वासने देवून सत्तेवर आलेल्या सरकारला शेतीसह उदयोग व्यवसाय क्षेत्रात कोणतेही विकास कामे करता आले नाहीत, अशा सरकारला सत्तेतून पायउतार करा, असे आवाहन माजी मंत्री तथा तुळजापूर तालुक्याचे विदयमान आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट गटातील गावच्या बुथ कमिटीची बैठक सोमवार दि. 13 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार चव्हाण हे बोलत होते. यावेळी जि.प. सदस्य ॲड. धिरज पाटील, प्रकाश चव्हाण, पं.स. सभापती शिवाजी गायकवाड, यशवंत गायकवाड, अशोक पाटील, संजय वाघोले, नारायण पटणे, शिवराज स्वामी, बसवराज कवठे, चेअरमन राजू पाटील, माजी सरपंच बसवराज माळगे आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गजेंद्र कदम यांनी तर सुत्रसंचालन प्रविण गंगणे यांनी केले. यावेळी प्रकाश चव्हाण, शिवाजी गायकवाड, धिरज पाटील आदींनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास तालुक्यातील जळकोट, हंगरगा नळ, आलियाबाद, मुर्टा, जळकोटवाडी, चिकुंद्रा, मानमोडी, मानेवाडी, हगलूर या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रा.पं. सदस्य जितू कदम, राजू चव्हाण, कुमार राठोड, दत्तू कदम, जीवन कुंभार यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.