नळदुर्ग : येथील बापू शेती सुधार केंद्र या दुकानातील गल्ल्यावर भरदिवसा अज्ञात चोरट्याने डल्ला मारत १५ हजार रुपये लंपास केल्याची घटना  रविवारी  दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सदरील घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली असून या घटनेमुळे व्यापा-यात एकच खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी दुकानाचे मालक अविनाश नरवडे यांनी नळदुर्ग पोलीसात अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार दाखल  दिली आहे. 

नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गानजीक उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या खालच्या माळ्यावर अविनाश तुकाराम नरवडे यांचे बापू शेती सुधार केंद्र हे दुकान आहे. या दुकानात व्यवस्थापक आसलेले शिवाजी पांडूरंग थावरे हे  रविवारी दुपारी ४ वाजता नेहमी प्रमाणे काम करत आसताना अज्ञात व्यक्तीने भेंडीचे बी आसलेले २० रूपये किमतीचे पँकेट घेतले. त्यानंतर पाचशे रूपयाचे सुट्टे मागितले, याचवेळी थावरे यांना संमोहीत करून दुकानाच्या गल्ल्यातील रोख १५ पंधरा हजार रूपये काढून घेतले. दुकानदार नरवडे यांनी सायंकाळी गल्ल्यात काहीच रक्कम दिसली नाही म्हणून सीसीटिव्ही तपासली असता ही चोरी झाल्याचे ध्यानात आले. तसेच जळकोट ता.तुळजापूर येथील संतोष कृषी सेवा केंद्र येथेही आशाप्रकारेच सदर अज्ञात  इसमाने सतीश पटणे यांच्या दुकानातूनही १४ हजार तीनशे रूपये चोरून घेऊन गेल्याचा उल्लेख अविनाश नरवडे यांनी नळदुर्ग पोलीसात दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे.

 
Top