दत्तात्रय शिंदे
तुळजापूर :- तुळजापूर पंचायत समितीमध्ये मनमानी कारभार चालू असुन महाराष्ट्र बंद असताना तसेच गणपूर्ती नसताना सभा घेतल्याचे दाखवले गेले. परंतु चुकीचा कारभार यापुढे सहन केला जाणार नाही असे तामलवाडी पंचायत समीतीचे सदस्य दत्तात्रय शिंदे यानी बोलताना सांगितले आहे.
    तुळजापूर पंचायत समितीची नुकतीच मासिक सभा गणपूर्ती नसल्याने कोरमअभावी तहकूब करण्याची वेळ सभापतीवर आली.  मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी दि.९ रोजी महाराष्ट्र बंद असताना पंचायत समिती सभापती  यानी मासिक सभेचे परिपत्रक जाहीर केले. परंतु संपुर्ण महाराष्ट्र बंद असल्याने सदस्य हजरच राहु शकले नाहीत. एकुण १८ सदस्यापैकी केवळ 3 सदस्य हजर होते. तरीही सभा झाल्याची दाखवण्यात आल्याचे शिंदे यांनी आरोप केला. ही गोष्ट कळताच शिंदे यांनी दुस-या दिवशी त्यांचे सहकारी सदस्य चित्तरंजन सरडे, शिवाजी गोरे, शरद जमदाडे यानी आक्रमक पवित्रा घेतला व कोरमअभावी सभा झालीच कशी याची चौकशी झालीच पाहिजे हा मुद्दा लावुन धरला. नंतर मात्र  नामुष्कीने मासीक सभा तहकूब करून पुढील सभा दि. १६ रोजी घेण्याचे पत्रक काढल्याचेही त्यांनी सांगितले.

 
Top