बार्शी (गणेश गोडसे) :
   अंतरशालेय तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत सुलाखे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल असे यश संपादन केले. सुलाखे हायस्कूलच्या ८ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. दिनांक २ व ३ ऑगस्ट रोजी या अंतरशालेय स्पर्धा संपन्न झाल्या होत्या.  
यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे 
१४ वर्षांखालील मुले शार्दूल राखंडे (प्रथम क्रमांक), सगर विघ्नेश (तृतीय क्रमांक),पाटकूलकर अथर्व (चतुर्थ क्रमांक), १४ वर्षांखालील मुली साक्षी- लोहीया (द्वितीय क्रमांक)
१७ वर्षांखालील मुली रजनी देवकते (तृतीय क्रमांक, १९ वर्षांखालील मुले पाटील सुदर्शन (चतुर्थ क्रमांक, हजारे जयदिप (पाचवा क्रमांक), १९ वर्षांखालील मुली कु. इकारे ऋचा (प्रथम क्रमांक) प्रशालेचे प्राचार्य पाटकूलकर आ.ग., उपप्राचार्या गोलकोंडा मा.सू, पर्यवेक्षक जोशी 
अ.प., इंगळे रा.द. यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख प्रमोद माळी, क्रीडा शिक्षक समिर वायकुळे, सुहास शिंदे, संतोष पवार,सुहास देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

 
Top