नळदुर्ग : मराठवाड्याचे विकासरत्न लोकनेते, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नळदूर्गचे नगरसेवक बसवराज धरणे व नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या वतीने नळदूर्ग ता. तुळजापूर येथे मंगळवार दि (7) रोजी जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 7 ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या या जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी बहुआयामी व्यक्तिमत्व - आ. मधुकरराव चव्हाण, सोशल मीडिया आणि आजची तरुणाई, शेतकऱ्यांची सद्यस्थिती- दशा आणि दिशा ,आमचे आजी आजोबा हरवले आहे आदी विषय घेण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक रुपये 7001 रोख व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तसेच द्वितीय पारितोषिक रुपये 5001 सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक 3501 सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, शिवाय 1501 ची उत्तेजनार्थ दोन पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तरी या स्पर्धेचा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील जास्तीत जास्त स्पर्धकाने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा नगर परिषदेचे नगरसेवक बसवराज धरणे, नगरसेवक विनायक अहंकारी ,संयोजक डॉ. संतोष पवार व भैरवनाथ कानडे यांनी केले आहे