
होय एक असाही नेता आहे ज्यांच्या दिवसाची सुरूवात गरजवंतांने केलेला फोन रिसिव्ह करून होते आणि झोपण्यापुर्वीही एखाद्या गरजूस उद्या तुमचे काम करू... या दिलासादायक व आश्वस्त करणाऱ्या वाक्याने..कारण आज दिवसभरात आनेकांची कामं मार्गी लागलेली असतातच..
होय असाही एक गरीबांचा नेता आहे, ज्यांच्या जनसेवेच्या किस्स्यांचेच पुढचे वीस भाग होवू शकतात, नुसते उच्च शिक्षितच नाही तर सुविचारांचा वारसाच घेऊन जन्माला आलेले एक नेतृत्व निर्माण झाले आहे. ते म्हणजे महेंद्र काका धुरगुडे... सध्या समाजमाध्यमात तुळजापूर विधानसभेचा आमदार कोण? या वर्षभरातील सर्वच सर्वेमध्ये महेंद्र काका धुरगुडे पहिल्या पसंतीचे उमेदवार ठरले असल्याची कार्यकर्त्यांतून चर्चा आहे.
वैधानिक इशारा - या नेत्यास भेटल्यानंतर व यांचे काम पाहिल्यानंतर (आपण दुसऱ्या पक्षाचे असाल तर) आपली पक्षनिष्ठा गळून पडू शकते.
महेंद्र काका धुरगुडे यांची वाटचाल.
स्वातंत्र्य सेनानी कै. भानुदास धुरगुडे यांचा समाजसेवेचा वारसा असल्यामुळे महेंद्र काका तरी कसे अपवाद ठरणार.
सन 1997 साली बंधू संजय भानुदास धुरगुडे यांनी जि.प. ची निवडणुक लढवली होती. तेथून महेंद्र काकांनाही राजकारणात रस निर्माण झाला.
सन 2007 पासून काका राजकारणात सक्रीय झाले, त्यांना ज्येष्ठ बंधू तथा सन ॲण्ड ओशन उदयोग समूहाचे चेअरमन राजकुमार धुरगुडे यासह सहा भावंडांच्या कुटूंबाची खंबीर साथ आहे.
- 2007 साली मंगरुळ जि.प. मतदार संघातून निवडणुक लढविली. केवळ 38 मतांनी निसटता पराभव. हा पराभवही नव्याने व पहिल्यांदाच व्होटींग मशिन दाखल झाल्यामुळे (मशिनबद्दल ग्रामीण भागात माहिती नव्हती) व उमेदवारांचे क्रम यात गफलत झाल्यामुळे निसटात पराभव झाला, असे कार्यकर्त्यात चर्चा आहे. पराभवानंतरही त्यांनी मतदार संघातील गावांना भेटी दिल्या. यावेळी अनेक मतदारांना अश्रू अनावर झाले होते. यानंतर पुन्हा कायम त्यांनी मतदाराशी संपर्क ठेवला. त्यामुळे आजतागायत त्यांचे मतदारांशी जिव्हाळयाचे संबंध आहेत.
त्याच साली ऑक्टोबर मध्ये राष्ट्रवादी युवक उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष म्हणून धुरगुडे यांची निवड झाली. जिल्हाभरात जवळपास सव्वा चारशे शाखा स्थापन केल्या (2007 च्या या कार्याचा धुरगुडे यांना आज तुळजापूर विधानसभेची तयारी सुरु असताना “त्या” 72 गावात फायदा होताना दिसत आहे). जिल्हाध्यक्ष असताना आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून दहा हजार शौचालयाची भांडी गरजूना मोफत वाटप केले. युवक जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असताना सर्वसामान्य नागरिकांसाठी जिल्हाभरात कामे केली.
- सन 2009 साली तुळजापूर विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आघाडी झाल्यामुळे पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार उमेदवारी माघारी घेतली.
- सन 2012 साली काटगाव जि.प. मतदार संघासाठी तयार केली होती, मात्र अचानक काक्रंबा जि.प. मतदार संघातून निवडणुक लढवली. माञ तरीही 1255 मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले.
जि.प. सदस्य झाल्यानंतर जि.प. मधील अनागोंदी कारभाराला आळा घालत. गरीब व ख-या गरजवंतापर्यत शासकीय योजना पोहचवल्या. उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यातून एकमेव पुरुष उमेदवार म्हणून महेंद्र धुरगुडे राष्ट्रवादीमधून निवडून आले होते. गरजू व गरीब लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला. ख-या गरजूपर्यंत योजना पोहचविण्याचे महत्वाचे कार्य यावेळी महेंद्र धुरगुडे यांनी केले.
सन 2014 साली जि.प. चे विरोधी पक्षेनेतेपद मिळाले. तत्पुर्वी सन 2013 साली राष्ट्रवादी तुळजापूर तालुकाध्यक्षपदी होते.
- सन 2017 साली नंदगाव जि.प. गटातून निवडणुक लढवली. यात धुरगुडे हे चांगल्या मताधिक्क्याने (1465) विजयी झाले.
- तुळजापूर तालुक्यातून सर्वाधिक सामान्यांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घडवून प्रश्न सोडवणारे महेंद्र धुरगुडे हे जिल्हयातील एकमेव लोकप्रिय सदस्य असल्याची ख्याती मिळविली आहे.
मतदारांना दिलेल्या आश्वासनाची कशी पुर्तता केली? राहत्या घरापासून ८७ किमीवरील मतदारसंघातही मतदारांशी सतत संपर्क कसा ठेवतात? आणि २०१८ मधील झंझावात, पायात भिंगरी म्हणजे काय? हे पाहू पुढील भागात.
पुढील भाग रविवार दि. 12 ऑगस्ट रोजीच्या वार्तापत्रात
वाचत रहा तुळजापूर लाईव्ह
आपल्या सुचना किंवा प्रतिक्रियेचे आम्ही स्वागत करतो.
Email : livetuljapur@gmail.com