बार्शी (गणेश गोडसे) :
    आपल्या देशामध्ये द्वैत, अद्वैत, विशिष्ठादैत अादि अनेक सिध्दांत आहेत. हे सिध्दांता स्वत:चा सिध्दांत प्रतिष्ठापना करण्यासाठी इतर सर्व सिध्दांताचे खंडण करतात. परंतु श्रीसिध्दांतशिखामणी हा धर्मग्रंथ कोणत्याही सिध्दांताचे खंडण न करता सर्व सिध्दांताचे सन्मान व आदर केल्यामुळे सर्व सिध्दांताचे शिखर आहे असे विचार श्री काशी जगदगुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले.दहिवडकर मठ येथे लिंगैक्य विश्वेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रीसिध्दांतशिखामणी तत्वामृत ग्रंथाच्या पारायण सप्ताह पार पडला. गुरूवारी दि.२ रोजी सप्ताहाच्या सांगता समारंभात आशिर्वचन करतांना ते बोलत होते.
 यावेळी ष.ब्र.गुरूसिध्द मणिकंठ शिवाचार्य दहिवडकर महाराज,ष.ब्र.गुरूगंगाधर शिवाचार्य औंधकर महाराज, ष.ब्र.विरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज, देवलिंग स्वामी मुंबई, प्रकाश शास्त्री देवळालीकर, विरशैव माहेश्वर मंडळ मुंबई व ओम पंचाक्षर माहेश्वर मंडळ साताराचे सदस्य व शिष्य उपस्थित होते.
 काशी महास्वामी म्हणाले, सिध्दांत म्हणजे आगम शास्त्राचा अंतीम निर्णय,लोककल्याणासाठी शिवाने अठ्ठावीस शैवागमांचे उपदेश केले असून त्या सर्व आगमांत समस्त मानवांना समान मानले आहे. वर्ण आणि आश्रमांच्या माध्यमातून समाजात जो भेदभाव केला जातो त्यास दूर करण्यासाठी श्री सिध्दांत शिखामणी ग्रंथात इष्टलिंग दिक्षा सांगीतली आहे. जो इष्टलिंग दिक्षा घेवून इष्टलिंग धारण करतो तो ब्राह्मण असो वा अंत्यज असो सर्व शिवस्वरूपच आहे असे सांगीतले आहे. अशा प्रकारे समस्त मानव समाजाला दिक्षाने समानतेचा दर्जा देवून मानव समाजाला सन्मार्ग दाखवणारा श्रीसिध्दांतशिखामणी एक श्रेष्ठ दार्शनिक ग्रंथ असून या ग्रंथाचे सर्वांनी पारायण, स्वाध्याय, त्यावरील किर्तन करावे. महास्वामीजींनी<br>
विद्वानांच्या सहाय्याने देशिय आणि विदेशीय अशा सोळा भाषांतून या धर्मग्रंथाचा अनुवाद करून घेतला आहे. याचे अॅप्लीकेशनही करण्यात आले असून श्रीसिध्दांतशिखामणी नावाचे अॅप्लीकेशन उघडून आपल्या अभिष्ट भाषेची निवड करून.हा ग्रंथ मोबाईलवरही डाउनलोड करून वाचता येते; याचा लाभ घ्यावा असेही काशी महास्वामीजी यांनी यावेळी सांगितले.

 
Top