बार्शी (गणेश गोडसे) :
   पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून गळ्यास कुकरी लावुन धमकावत एका तरूणास जबरदस्तीने दुचाकीवर बसवुन घेऊन जाऊन मारहाण करून जखमी केल्याची घटना बार्शी शहरातील शहरातील एका कॉलेजच्या पाठीमागील बाजुच्या मैदानावर घडली.अनिल मोहन साळुंखे वय 20 रा. रामेश्वर मंदीजवळ, बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.विकी दांडगे , गणेश भोकरे, कुणाल जाधव व सोन्या डोंगरे अशी एका तरूणास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. 
    साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि ते जामगाव रस्त्यावरील एका बॅकेत खात्यावर पैसे जमा करून बॅकेच्या बाहेर आले असता मागील झालेल्या भांडणाचा राग मनात धरून विकी दांडगे, गणेश भोकरे , कुणाल जाधव  व सोन्या डोंगरे हे मोटरसायकल वरून डबलसीट बसुन येवून त्याच्याजवळ आले.तसेच शिवीगाळी करून फिर्यादीस मारहाण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या नरडीवर कुकरी ठेवून त्यांच्या जवळील मोटरसायकलवर जबरदस्तीने मध्यभागी बसवुन काॅलेज पाठीमागील मैदानात घेवून गेले.नंतर कुणाल जाधव, सोन्या डोंगरे हे दोघे तेथे आले.  साळुंखे यास खाली उतरवून त्याच्या हातातील कुकरीची मुठ डोक्यात मारली व कुकरी उलटी धरून करीच्या बोथट बाजुने डाव्या पायाच्या गुडघ्यावर तसेच हाताच्या कोप-यावर मारले. गणेश भोकरे याने त्याच्या कमरेच्या पट्टयाने पाठीवर मारले. दोघांनी तोंडावर, मानेवर, पायावर, पोटात, पाठीवर लाथाबुक्क्यानी मारहाण केली. सदर चौघेजण मारहाण करत असताना त्यांच्या हातातील मित्राने भेटवस्तू म्हणून दिलेले 4 हजार रूपये किंमतीचे घड्याळ झटापटीत पडले आहे.त्यानंतर चौघांनी फिर्यादीस तु गप्प गाडीवर बस नाही तर तुला इथेच कुकरीने मारू असे धमकी देउन परत दुचाकीवर बसवुन घेवन जात असताना फिर्यादीना हाताने गाडीची चावी बंद केल्याने गाडी बंद पडल्याने ते गाडीवरून उतरून सदर गाडीवरील दोघांना हिसका देवन पळून गेले.अधिक तपास हवालदार चंद्रकांत आदलिंगे करत आहेत.
 
Top