बार्शी (गणेश गोडसे) :
     अखिल भारतीय गाडी लोहार समाज सेवा संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी बार्शी येथील युवा उद्योजक उमेश मधुकर आणेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांच्या सहीचे पत्र नुकतेच बार्शी येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात आणेराव यांना देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनोज चव्हाण,बीड जिल्हा संघटक आश्रुबा आणेराव ,बीड तालुका अध्यक्ष सतीश घोडके ,प्रदेश सदस्य सुमित पिंपळे आदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच जिल्हा उपाध्यक्ष सचिन चव्हाण,जिल्हा संघटक रमेश डोंगरे ,जिल्हा सचिव बालाजी कळसकर आदींच्या निवडी यावेळी जाहीर करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
     यावेळी बोलताना नुतन जिल्हाध्यक्ष उमेश आणेराव म्हणाले की जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून नवीन शाखा काढून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असून  तरुणांची फळी तयार करुन रोजगारासाठी मदत करणार. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सत्कार समारंभ ,शालेय साहित्य वाटप, स्नेहमेळावा, कौटुंबिक मेळावा ,समाजातील थोर संत विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजन करणे समाजातील सर्व घटकांना एकत्रित करुन त्यांच्या विकासासाठी कार्यरत राहणार असुन विविध शासकीय विभागाकडे पाठपुरावा करुन सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच भविष्यात संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले  यावेळी दिपक नवगीरे ,गणेश डोंगरे ,अतिश आणेराव,चंद्रकांत घोडके, अविनाश आणेराव, निखिल,अभिषेक काळे नागेश पिंपळे,दिपक आहेर आदीं सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top