तुळजापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षे तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन तुतारी चिञ प्रदर्शन भित्तीपञिका या विशेषांकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ .एस.बी.शेतसंदी यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर तुतारी अंक कनिष्ठ विभागाचे मराठी विभाग प्रमुख रावसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण करण्यात आला. अंकाबद्दल मार्गदर्शन करताना प्रा.देशमुख म्हणाले की शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे यांनी १९४२ च्या क्रांती लढ्यात महात्मा गांधीच्या विचाराने प्रेरित होऊन सातारा भागातील गोविंदराव खोत,क्रांतिसिंह नाना पाटील,वसंतदादा पाटील,शामराव जाधव आदि समाज सुधारकांच्या सहवासात राहुन आपले मोठ्या प्रमाणात योगदान दिले.त्यांनी दिलेल्या या योगदानाचे वर्णन हे त्यांच्याच सातारा जिल्ह्याचा क्रांती ईतिहास या ग्रंथात आपणास दिसुन येते.सदर तुतारी अंक हा चिञ स्वरुपात निर्माण झाल्यामुळे शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे यांचा चिञस्वरुपातील ईतिहास प्रथमच विद्यार्थ्यांना पहावयास मिळाला. या वेळी प्रा.धनंजय लोंढे ,प्रा.आशपाक आतार, प्रा.श्रीमती कदम, डॉ. फर्जाना तांबोळी, प्रा.हणमंतराव साळुंखे ,प्रा.क्षीरसागर,प्रा.अनिल नवञे आदिची प्रमुख ऊपस्थिती होती. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनि मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.