उमरगा :- तालुक्यातील दाळींब अंतर्गत येणा-या शास्त्रीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवी पर्यंतच्या 121 विदयार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुली 54 व मुले 67 असे एकूण 121 विदयार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मंगळवार रोजी गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सी.जी. पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य गुलाब पवार, उपसरपंच रविंद्र राठोड, ओमसिंग राठोड, माजी शालेय समितीचे अध्यक्ष डी.जी. पवार, राजेंद्र चव्हाण, सौ. आशा जगदीश पवार, बबिता बाळू चव्हाण, विदयार्थी प्रतिनिधी योगेश पवार, यशराज पवार, पल्लवी चव्हाण यांच्यासह शिक्षक, विदयार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.