अणदूर :- स्वातंत्र्यदिनानिमित्त महसूल विभागामार्फत अणदूर ता. तुळजापूर येथील हुतात्मा स्मरकामध्ये माजी सरपंच तथा सदस्य धनराज मूळे, डॉ जितेंद्र कानडे, सेवा संस्थेचे उपाध्यक्ष सिद्राम शेटे, संचालक बालाजी घुगे, कल्याण कुताडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी अणदूर सज्जाचे तलाठी श्री मटके, साहेबलाल शेख आदी उपस्थित होते.