नळदुर्ग :- तुळजापूर तालुक्यातील वसंतनगर येथील नाईक मागास समाज सेवा मंडळ संचलित वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत स्वांतंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वैभव जाधव यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश नकाते, गणपत जाधव यांच्यावतीने माजी सैनिक बाळू जाधव, प्रकाश मोरडे, शिवाजी माने, विश्वास माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते. तसेच यावेळी मोरया प्रतिष्ठान नळदुर्गच्या वतीने विदयार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

 
Top