नळदुर्ग :- नंदगाव ता. तुळजापूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी पंचायत समिती सदस्य सिध्देश्वर कोरे, सरपंच सरस्वती कलशेट्टी, काटे गुरुजी, चेअरमन धर्मा तुपे, माजी उपसरपंच गजानन मोरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष मैल्लिनाथ पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रा.पं. सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विदयार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी नंदगाव येथील विविध विकास सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा आदी ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात धुरगुडे सहभागी झाले होते. तसेच यावेळी धुरगुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 
Top