नळदुर्ग :- स्वातंत्र्य दिनानिमित्त नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला व शहरातील शासकीय, निमसशासकीय कार्यालये, शाळा, महाविदयालयात ध्वजारोहण करण्यात आले. 

ऐतिहासिक किल्ल्यात तुळजापूरचे नायब तहसिलदार अमित भारती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक डी.डी. राडकर, तलाठी तुकाराम कदम, मंडळाधिकारी अमर गांधले, फुलारी महमद रफी, नगरसेवक शहबाज काझी, बसवराज धरणे, विनायक अहंकारी, शिवसेनेचे कमलाकर चव्हाण, शहरप्रमुख संतोष पुदाले, सरदारसिंग ठाकूर, माजी नगरसेवक इमाम शेख, युनिटीचे जयभीम वाघमारे, यशवंत राठोड, जुबेर काझी, नागेश लंगडे, मुश्ताक जमादार, हाजी शेख यासह विविध शाळेचे विदयार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत केंद्रीय मुख्याध्यापक डी.एस. आलुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर नगरपालिकेत नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे व मुख्याधिकारी रमाकांत गायकवाड, पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालयात प्राचार्य मोहन बाबरे, अंजनी प्रशालेत सुभद्रा मुळे, शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सगर,  एसटी बसस्थानकात वाहतुक नियंत्रक महेश डुकरे व श्रीकांत जगदाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

त्याचबरोबर जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जि.प. प्राथमिक शाळा,  नॅशनल मराठी शाळा, स्वामी विवेकानंद इंग्लीश मेडियम स्कूल, डॉ. आंबेडकर इंग्लिश मेडियम स्कूल, महमद अब्दूला शहा ऊर्दू मेडियम स्कूल, गुरुकुलम किडस स्कूल, अध्यापक विदयालय, आपलं घर, हुतात्मा स्मारक आदी ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

 
Top