कळंब (भिकाजी जाधव) :-

गंभिरवाडी ता. कळंब येथील विद्यार्थी प्रेमी शिक्षक श्री महादेव खराटे यांनी आपला विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाला म्हणून त्यास  सायकल बक्षीस देऊन त्यांनी सत्कार केला.

जिल्हापरिषद प्राथमिक शाळा गंभीरवाडी ता. कळंब येथील सर्वसामान्य कुटुंबातील इयत्ता पाचवी चा विद्यार्थी अशोक महेश देवकर याने फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून शिष्यवृत्ती धारक झाल्याबद्दल या शाळेतील विद्यार्थी प्रेमी व अशोकला मार्गदर्शन करणारे शिक्षक कळंब तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष श्री महादेव खराटे यांनी अशोकला 3500 रू किमतीची सायकल बक्षीस देऊन स्वातंत्र दिनी सत्कार केला. या विद्यार्थी प्रेमी शिक्षकांचे शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती यमुना देशमुख यांनी कौतुक केले.

तसेच सुंदर गोडगे यांनी 2001/- रू, वाशी शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठल माने यांनी 1100/- रू बक्षीस देऊन अशोक चा सन्मान केला  ,या सत्कार कार्यक्रमास पोलीस पाटील अशोक माने, सरपंच सौ. मंदाकीनी सुतार, सौ. शोभा विठ्ठल माने तसेच अशोक चे आई -वडील व गावातील शिक्षणप्रेमी नागरीक व शिक्षक उपस्थित होते 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक  शिवराज घोंगडे यांनी व सूत्रसंचालन महादेव खराटे तर आभार हरीभाऊ मोरे यांनी मानले तसेच विक्रम गरड, श्रीमती के. व्ही भंडारे व श्रीमती मई डांगे यांनी परिश्रम घेतले.
 
Top