अणदूर :- १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासुन तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथिल गायरान जमिन सर्व्हे नंबर 774 च्या शासकीय मोजणीनुसार चर मारुन हद्दी कायम करावी, अतिक्रमण धारकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी १० वाजल्यापासुन ग्रामपंचायत सदस्य मनोज कस्तुरे यांच्यासह अकरा ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
अणदूर येथील गायरान स न 774 नवीन 518 हे 27हे 07 आर इतके विस्तीर्ण असून त्यावर गरीब गरजू लोकांच्या वस्त्या आहेत. या जमिनीची 2003 व 2016 साली शासकीय मोजणी झाली असता पूर्वेकडे स न 7 व 8 मधील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून प्लॉट पाडून विक्री केल्याचे स्पष्ट झाले तरीही सदरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे, मोजणीनुसार चर मारुन किंवा बांध टाकून हद्दी कायम केल्यास सदरील जागेचा विविध कार्यालये, व्यापारी संकुलन व गरजू बेघर लोकांसाठी, पर्यायाने गावच्या विकासासाठी याचा उपयोग होईल. अतिक्रमणधारकांविरुध्द कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणामध्ये ग्रामपंचायत सदस्य मनोज कस्तुरे, नागनाथ चौधरी, गुरुनाथ गवळी, दिलीप सुतार, भुजंग कांबळे, तुकाराम महबोले, तुकाराम लोहार, सुभाष काळे, वसंत ननावरे, प्रकाश आलूरे आदीजण बेमुदत उपोषणास बसले आहेत.
उपोषणकर्त्याना राजेश देवसिंगकर, कल्याणी मूळे, धोंडिबा लंगडे, अंबादास क्षीरसागर, राजू कळके, आनंद मूळे यांनी साखळी उपोषनद्वारे आपला पाठिंबा दिला आहे. दरम्यान दिवसभरात संबंधित अधिका-यानी भेट दिली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
या उपोषणास माजी सरपंच धनराज मुळे, उपसरपंच आप्पाराव मुळे, अलका बिराजदार, जयश्री स्वामी, जितेंद्र कानडे, नागनाथ कुंभार,अनुसया कांबळे,नालसाब शेख, कोमल बनसोडे, गणेश सूर्यवंशी या ग्रामपंचायत सदस्यांसह संघर्ष समितीचे अध्यक्ष आर.एस. गायकवाड यांनी पाठिंबा दिला आहे.
व्हिडिओ पहा -