नळदुर्ग -: आलियाबाद ता. तुळजापूर या स्मार्ट ग्रामपंचायतीस दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी औरंगाबाद येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात औरंगाबाद विभागातून दुसरा क्रमांकाचे पारितोषिक ना. डि. बी. सावंत व विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आलियाबाद ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांचे आमदार मधुकरराव चव्हाण, जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, तुळजापूर पंचायत समितीचे सभापती शिवाजी गायकवाड, ग्रामविकास अधिकारी प्रशांत भोसले, सरपंच सौ. ज्योती चव्हाण, उपसरपंच सुर्यकांत राठोड, ग्रा.पं. सदस्य विलास राठोड, प्रकाश राठोड, घमाबाई राठोड, धानाबाई राठोड, रेखा चव्हाण, दिनेश राठोड आदीजण उपस्थित होते.