कळंब (भिकाजी जाधव) :- 

जुन्या पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने दि. 2 ऑक्टोबर रोजीपासून दिंडी काढण्यात येणार आहे. त्याबाबत उस्मानाबादचे पालकमंत्री ना. अर्जुन खोतकर यांना जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा शाखेच्यावतीने निवेदन देवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खोतकर यांनी मी स्वतः पेन्शन दिंडीमध्ये सहभागी होईन असे ठाम आश्वासन दिले.

 संघटनेच्या जिल्हा मेळाव्याला उपस्थित राहणार - आ. सुजितसिंह ठाकूर

    यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्याशी निवेदन देवून सविस्तर चर्चा करण्यात आली.  त्यांना संपूर्ण विषय व त्याचे गांभिर्य सांगितल्यानंतर त्यांनी आगामी नियोजित संघटनेच्या जिल्हा मेळाव्याला उपस्थित राहीन , असे ठाम आश्वासन दिले.

यावेळी  जिल्हाध्यक्ष प्रशांत माने, विभागीय संपर्क प्रमुख बाळासाहेब शिंदे, जिल्हा प्रवक्ता वाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाघमारे,कळंब तालुकाध्‍यक्ष अध्यक्ष नारायण बाकले, तुळजापूर अध्यक्ष बाळासाहेब घेवारे,उमरगा अध्यक्ष झिंगाडे, लोहारा अध्यक्ष कलशेट्टी, कळंब ता.सचिव मोहन सोनटक्के, शिक्षक प्रदीप सर्जे,  अविनाश खरडकर आदी  उपस्थित होते.

 
Top