औरंगाबाद :- राष्ट्रीय बंजारा मिशनने महाराष्ट्र राज्यात कार्यकर्त्यांचे संघटन करुन आठ महिन्यात राज्यात अडीचशे हून अधिक पदाधिका-यांची नेमणूक करत बंजारा समाजाच्या एस.टी. आरक्षणाचा पाया मजबूत केला आहे. रविवार दि. 19 ऑगस्ट रोजी बदलापूर मुंबई येथे मिशनची बैठक होणार असून या बैठकीत एस.टी. आरक्षण लढयाची रणनिती व चर्चा होणार असल्याची माहिती मिशनचे राष्‍ट्रीय अध्यक्ष देवराव राठोड यांनी दिली. 

"यह मिशन नही मिसाल है, संविधान उनका हथियार है" हे घोषवाक्य घेवून बंजारा समाजाच्या एस.टी. आरक्षणासाठी राष्ट्रीय बंजारा मिशन संविधानिक पध्दतीने लढा देत आहे. महाराष्ट्रातील गोर बंजारा बांधव व काही संघटना एकत्र येवून राष्ट्रीय बंजारा मिशनच्या आरक्षण लढयास साथ देत आहेत. 

 
Top