उस्मानाबाद :- विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादीत उस्मानाबाद या संस्थेवर अध्यक्ष म्हणून ॲड. खंडेराव चौरे यांची नियुक्ती उस्मानाबाद सहाय्यक निबंधक सहकारी यांनी केली आहे.
प्रधिकृत मंडळाचे अध्यक्ष म्हणून अॅड.खंडेराव हिरश्चंद्र चौरे व सदस्य म्हणून अतुल शामराव बागल,व जयंत किसनराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थचे मावळते अध्यक्ष प्रल्हाद मुंडे यानी नूतन संचालक मंडळाचा सत्कार केले. मंगळवार रोजी संस्थेच्या कार्यालयात सदर प्रशासकीय मंडळाने पदभार स्विकारला आहे.
या प्रसंगी प्रधिकृत अध्यक्ष अॅड.खंडेराव चौरे, अतुल बागल, जयंत पाटील, नितीन गोडसे, सेक्रेटरी गजराज माळी, संतोष राऊत, सरपंच राम पाटील याची उपस्थित होती.