तुळजापूर :- दडी मारलेल्या पावसाचे तुळजापूर तालुक्यात दि. 15 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजल्यापासून सर्वत्र आगमन झाले आहे. खरीपातील माना टाकणा-या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले असून शेतक-यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र तालुक्यातील अनेक प्रकल्पामध्ये अत्याल्प पाणीसाठा असून हे प्रकल्प भरण्यासाठी मोठया पावसाची गरज आहे. 

तब्बल महिना भराच्या प्रतिक्षेनंतर बुधवार रोजी  तुळजापूर,  नळदुर्ग, इटकळ, सावरगाव, मंगरुळ, जळकोट, सलगरा दिवटी या महसूल मंडळात पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवार रोजी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरु आहे. सर्वाधिक पाऊस मंगरूळ मंडळात तर सर्वात कमी पाऊस जळकोट मंडळात झाले आहे.

 मंडळनिहाय झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे - 

तुळजापूर मंडळात 67 मि.मी., मंगरुळ मंडळात 150 मि.मी., सावरगाव 97 मि.मी., नळदुर्ग 80 मि.मी., जळकोट 45 मि.मी., सलगरा दिवटी 6‍2 मि.मी., इटकळ 125 मि.मी. एवढे पाऊस झाल्याची नोंद आहे.

 
Top