तुळजापूर :- येथील श्री तुळजाभवानी महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधुन वाणिज्य विभागातर्फे चॉईस बेस क्रेडीट सिस्टम या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ .सुयोग अमृतराव,संचालक व्यवस्थापन शास्ञ विभाग डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपकेंद्र परिसर उस्मानाबाद हे उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की, देशातील विद्यापीठांचा अभ्यासक्रम बदलत्या काळानुसार परीवर्तित होत आहे,त्याचाच एक प्राथमिक टप्पा म्हणजे चॉईस बेस क्रेडीट सिस्टम होय,यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या विषया व्यतिरिक्त अन्य विषयामध्ये सुध्दा प्रवेश मिळणार आहे आणि या विषयाच्या गुणांकना सहित त्याचे संपूर्ण गुणांकन निश्चित होणार आहे.केंद्र सरकारच्या मेक ईन इंडिया ,डीजिटल इंडिया या योजना कौशल्य विकासावर आधारित असुन या द्वारे देशाची आर्थिक व सामाजिक स्थिती अधिक बळकट होणार आहे.अंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थित्यंतरे हे तरुणांनी अभ्यासण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एन.बी.काळे यांनी तर अध्यक्षीय मनोगत प्रा.डॉ .टी.एल.बारबोले यांनी व्यक्त केले.सूञसंचलन प्रा.बी.डब्ल्यु.गुंड तर आभार प्रा.बी.के.नगरे यांनी मानले,कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनि तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने ऊपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ .एस.बी.शेतसंदी यांचे मार्गदर्शन लाभले.